Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ शाळा होणार डिजिटल

 सातारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ शाळा होणार डिजिटल

            प्रतिक मिसाळ- सातारा

 खासगी आणि शासकीय शाळा यांमधील दरी कमी व्हावी आणि ग्रामीण भागातील शाळांचे चित्र बदलून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शासन जिल्हा परिषदेच्या 300 शाळा या ' मॉडेल शाळा ' म्हणून विकसित करणार आहे . त्यात सातारा जिल्ह्यातील नऊ शाळांची निवड करण्यात आली आहे . पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांत याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे . अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गौडा यांनी दिली 

शाळांसाठी चांगली इमारत , सर्व क्रीडा साहित्याची उपलब्धता , सायन्स लॅब , ग्रंथालय , विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीचे पोषक वातावरण पुस्तकापलीकडे जाऊन शिकवण्याची पद्धती , विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर भाषा गणित याची संकल्पना समजावून सांगणे , विद्यार्थ्यांच्या कौशल्य निर्मितीला वाव देणे , संभाषण कौशल्य विकसित करणे , कृतीयुक्त शिक्षणातून ज्ञानाची निर्मिती करणे विद्यार्थ्यांत नेतृत्वगुण विकसित करणे , विद्यार्थ्यांना ताणविरहित शिकता येणे आणि विद्यार्थ्यांचा शारीरिक , बौद्धिक मानसिक विकास करणे हे आदर्श शाळेचे मुख्य उद्दिष्ट आहे . त्यानुसार संबंधित शाळांत मुख्याध्यापक , शिक्षकांमार्फत कार्यवाही केली जाणार आहे . एक दिवस दप्तराविना विद्यार्थ्यांना ताणमुक्त शिकता यावे , पुस्तके , दप्तरापलीकडे जाऊन शाळेत , शाळेच्या परिसरात उपलब्ध साधन- सामुग्रीसह विविध विषयांतील ज्ञान अवगत करण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस तरी दप्तराच्या ओझ्यापासून मुक्तता देण्यात येणार आहे . त्यासाठी दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम संबंधित शाळांत राबवण्यात येणार आहे . जिल्ह्यातील नऊ शाळा सातारा जिल्ह्यातील नऊ जिल्हा परिषद शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे . त्यात कराड तालुक्यातील उंब्रज , खटाव तालुक्यातील कुरोली - सिद्धेश्वर , कोरेगाव तालुक्यातील एकंबे , महाबळेश्वर तालुक्यातील भिलार , माण तालुक्यातील पानवण , पाटण तालुक्यातील तारळे , फलटण तालुक्यातील तरडगाव , वाई तालुक्यातील खानापूर , सातारा तालुक्यातील वर्णे या शाळांचा समावेश आहे . प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर म्हणाल्या जिल्हा परिषदेच्या शाळा ' मॉडेल स्कूल ' करण्यात येणार आहेत . त्याअंतर्गत शाळांत सर्व भौतिक सुविधा , चांगले प्रशासकीय कामकाज आणि उच्च दर्जाची शैक्षणिक गुणवत्ता राखण्याची कार्यवाही केली जाईल .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies