खिलारवाडी येथे बिबट्याच्या धुमाकूळ...शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...वनविभागाचे दुर्लक्ष..... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

खिलारवाडी येथे बिबट्याच्या धुमाकूळ...शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...वनविभागाचे दुर्लक्ष.....

खिलारवाडी येथे बिबट्याच्या धुमाकूळ...शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...वनविभागाचे दुर्लक्ष.....

हेमंत पाटील-पाटण


खिलारवाडी तालुका पाटण येथे  बिबट्यांचा वावर वाढला आहे.हा भाग पूर्ण डोंगराळ असून शेती ही पूर्ण डोंगराळ भागाच्या कडेला आहे..बिबट्यांच्या तावडीत आता पर्यंत बकरे शेळ्या मांजरे कुत्री आली असून ह्यामुळे शेतकऱ्यामध्ये पूर्ण घबराट निर्माण झाली आहे..

सध्या ह्या भागात ऊसतोड चालू असून बिबट्यांच्या भीती मुळे ऊसतोड करण्या साठी आलेल्या टोळ्या सुधा ह्या भागातून पलायन करू लागल्या आहेत..शेतकरी वर्गाने ह्या बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे..परंतु अजून ही काही ठोस पावले ही वनविभाग मार्फत उचलली गेली नाहीयेत.बिबट्यांच्या हल्यात एखादा शेतकरी किंवा कोणी माणूस आल्यावरच वनविभाग लक्ष घालणार का अशी विचारणा होऊ लागली आहे.....

No comments:

Post a Comment