मिनरल वॉटर जार निर्मिती क्षेत्रात बेकायदेशीर कामाला पाठिंबा देणार नाही :छत्रपती संभाजीराजे भोसले
मिलिंद लोहार-पुणे
राष्ट्रीय हरित प्राधिकरणात असोसिएशनने बेकायदेशीर कुल जार मधील पाणी निर्मिती चे प्रकल्प बंद करण्याविषयी याचिका दाखल केली होती . या याचिकेचा निकाल असोसिएशन च्या बाजूने लागला आणि बेकायदेशीर प्रकल्प बंद करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत .ही प्रशासकीय प्रक्रिया सुरु झाली आहे. तरीही काही जण बेकायदेशीर प्रकल्प चालू ठेवत असतील तर ते कारवाईस पात्र ठरतील ,अशी भूमिका विजयसिंह डुबल यांनी या भेटी दरम्यान मांडली .