माझी आई काळुबाई मालिकेचा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 11, 2020

माझी आई काळुबाई मालिकेचा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता

 माझी आई काळुबाई मालिकेचा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता

अभिनेत्री अलका कुबल यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागितलीच पाहिजे:-शोर्यपीठ तुळापूर येथील गोरक्षराजे वाळके पाटील यांची मागणी.

मिलिंद लोहार/राम जळकोटे 
महाराष्ट्र मिरर टीम

आई माझी काळुबाई या  मालिकेचा वाद सध्या चांगलाच पेटलेला आहे सिने अभिनेत्री अलका कुबल व प्राजक्ता गायकवाड  यांच्यात  आरोप-प्रत्यारोप होत आहेत यातच आज स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या मालिकेत राणी येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड यांचा खालच्या स्तरावर जाऊन अपमान करणाऱ्या अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागितलीच पाहिजे असा इशारा तुळापूर येथिल गोरक्षराजे वाळके पाटील यांनी दिला आहे.


आई माझी काळूबाई या सेटवर काम करीत असताना कोरोनाच्या रुग्णांना कोविड रुग्णालयात सोडुन आलेल्या एका कलाकारा सोबत अलका कुबल यांनी  प्राजक्ता गायकवाड यांना मुंबई ला जाण्यास सांगितले होते.परंतु प्राजक्ता गायकवाड यांनी नकार दिल्यानंतर त्या व्यक्तीने प्राजक्ता गायकवाड यांना शिवीगाळ केली.

याबाबत ही माहिती अलका कुबल  यांना सांगण्यासाठी गेले असता तिथे प्राजक्ता गायकवाड यांचा अलका कुबल यांनी अपमान केला,लाज काढली,तर हा सगळा प्रकाराबद्दल अलका कुबल व शिविगाळ करणारे कलाकाराने माफी मागावी अशी मागणी आता गोरक्षराजे वाळके पाटील हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment