आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विकासापासून कोसो दूर रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन!!! - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, November 9, 2020

आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विकासापासून कोसो दूर रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन!!!

 आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विकासापासून कोसो दूर रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन!!!

सोहेल शेख-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत


कर्जत तालुक्यातील वावलोली ते भातगाव, वरई ते इंजिवली, नानामास्तर नगर ते मालवाडी व दामत ते भडवळ  अशा दुर्लक्षित रस्त्यांचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.या गावांना मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी आमदार थोरवे यांनी विशेष प्रयत्न केले.वर्षानुवर्षे या गावातील नागरिकांना मुख्य रस्त्यावर येईपर्यंत चिखल तुडवायला लागत होता.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक वर्ष होऊन गेले आहे.या कालावधीत राज्यात अनेक नवनविन निर्णय तसेच कामे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातही राज्य शासनाच्या निधीच्या माध्यमातून अनेक विकास कामे होत आहे. आज ग्रामविकास विभाग ३०५४ अंतर्गत ४ रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रामुख्याने अनेक वर्षे हे रस्ते प्रलंबित असल्या कारणाने प्रथम प्राधान्य या रस्त्यांना देण्यात आले असून उर्वरीत ज्या ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत तेही लवकरात लवकर तयार केले जातील असे आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले. या प्रसंगी जिल्हा सल्लागार भरत भगत, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, संघटक शिवराम बदे, माझी सभापती मनोहर थोरवे, तसेच पंचायत समिती सभापती उपसभापती सदस्य, तालुक्यातील सर्व उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख ग्रामपंचायत सरपंच,सदस्य तसेच त्या विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते...यात प्रामुख्याने कर्जत तालुक्यातील वावलोली ते भातगाव, वरई ते इंजिवली, नानामास्तर नगर ते मालवाडी व दामत ते भडवळ या रस्त्यांचा समावेश आहे.....No comments:

Post a Comment