ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत तालुक्यातील ओबीसी समाज समितीच्या वतीने आज दी. २६ रोजी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ही मागणी करण्यासाठी कर्जत खालापूर चे आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन देण्यात आले.
आज ओबीसी संघर्ष समिती च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भरात महाराष्ट्र राज्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्थानिक आमदार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील ओबीसी संघटनांनी सुध्दा पुढाकार घेत आमदार महेंद्र थोरवे यांना जातीनिहाय जनगणना करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी कर्जत तालुक्यातील ओबीसी समाजातील सर्व जाती मधील प्रतिनिधी उपस्थित होते . यामध्ये आगरी समाज अध्यक्ष सावळाराम जाधव , लोहार समाज अध्यक्ष जोशी, नाभिक समाज अध्यक्ष दिलीप शिंदे, धनगर समाज अध्यक्ष कोकरे,तसेच इतर जातींचे प्रतिनिधी देखील हजर होते. त्याचबरोबर इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे, अरविंद पाटील भगवान धुळे, विजय कोंडिलकर, शिवराम तुपे, दिलीप शेळके, देविदास कोळंबे, नंदकुमार कोळंबे, रोहिदास लोभी, रविंद्र सोनावळे आदी उपस्थित होते.