सातारा विश्रामगृहात अचानक खासदार उदयनराजे भोसले यांचे आगमन झाले. पोर्चमध्ये येताच त्यांनी कोण थांबलंय असे विचारले. त्यावेळी रामराजे साहेब असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उदयनराजे गाडीतून उतरले व थेट रामराजे बसलेल्या एक नंबरच्या सुटमध्ये गेले. रामराजे आणि उदयनराजे यांच्यामध्ये अनेक महिन्यापासून वितुष्ट होते लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधील वाद टोकाला गेले होते उदयनराजे आणि रामराजे यांच्यातील वाद संपूर्ण जिल्हावासियांनी पाहिला आहे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या पावसाच्या भाषणाच्या वेळेस रामराजे यांनी थेट उदयनराजेंवर टीका केली होती त्यानंतर उदयनराजे यांना पराभव पत्करावा लागला होता मात्र असे समजते की दोघांमधील एक कॉमन मित्र आहे त्याने त्या दोघांनाही बसण्यास सांगितले व दोघांनी बसल्यानंतर दिलखुलास गप्पा रंगल्या व एकमेकांनी कोरोनाबद्दल चर्चा केल्या व एकमेकांनी आपापली काळजी घेणे गरजेचे आहे असे एकमेकांना बोलले