चिपळूण एसटी स्थानकाचा ठेका अखेर रद्द; शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या लढ्याला मोठे यश - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, November 1, 2020

चिपळूण एसटी स्थानकाचा ठेका अखेर रद्द; शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या लढ्याला मोठे यश

 चिपळूण एसटी स्थानकाचा ठेका अखेर रद्द; शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या लढ्याला मोठे यश

            ओंकार रेळेकर-चिपळूण

रखडलेल्या चिपळूण एसटी स्थानक कामाचा ठेका संबंधित ठेकेदारकडून काढून घेण्यात आला असून येत्या दोन दिवसात कामाच्या नवीन निविदा प्रसिद्ध होणार आहेत.तसेच संबंधित ठेकेदाराला थेट काळ्या यादीत टाकण्यात आले असून त्याची अनामत रक्कम देखील जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी पुकारलेल्या आंदोलनाला या निमित्ताने मोठे यश मिळाले आहे.

या बाबत संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.संबंधित विभागाकडून त्यांना आलेले पत्र समोर ठेवत ते म्हणाले.कोणाचाही ठेका रद्द व्हावा ही आमची इच्छा नव्हती किंवा तशी मागणी देखील मी केलेली नाही.सर्वसामान्य गोरगरीब जनतेला जो त्रास सहन करावा लागत आहे.त्यासाठी चिपळूण एसटी स्थानकाचे काम तात्काळ सुरू करा अशी आमची मागणी होती.परंतु अधिकारी जबाबदारी ढकलत होते.त्यामुळे मी आंदोलनाचा इशारा देऊन माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो असे ते म्हणाले.

           २०१७ मध्ये कामाची ऑर्डर देण्यात आली आणि २०१९ मध्ये काम पूर्ण करायचे होते.परंतु अद्याप फक्त पाया भरणीचे काम करून ५५ लाख ठेकेदार घेऊन गेला.असे असताना अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकने योग्य नव्हते.आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकारी मला येऊन भेटले.तसेच आमचे नेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी देखील मध्यस्ती केली.त्यामुळे दोन दिवसांची वेळ देण्यात आली होती अशी माहिती देखील त्यांनी दिली.

               आता तर संबंधित ठेकेदार स्कायलार्क कंपनीने आपण हे काम करू शकत नाही असे पत्र विभागाला दिले आहे.त्यामुळे मी सुरुवातीपासून जे बोलत होतो ते सत्य समोर आले.ठेकेदार हे काम करू शकत नाही हे बाब स्पष्ट झाली आहे.आणि त्याचा ठेका रद्द करण्यात आला असून त्याची अनामत रक्कम देखील जप्त करण्यात येणार आहे.असे पत्र संबंधित विभागाने दिले आहे.तसेच येत्या दोन दिवसात कमी मुदतीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून स्थानिक ठेकेदारांनी त्यामध्ये भाग घ्यावा आणि एक सुसज्ज अत्याधुनिक एसटी स्थानक लोकांच्या सेवेत द्यावे असे आवाहन देखील संदीप सावंत यांनी यावेळी केले.ठेका रद्द झाला म्हणजे विजय झाला असे अजिबात नव्हे.ती आमची संस्कृती नाही.असे होताच कामा नये.परंतु विनाकारण लोकांना त्रास दिला जात असेल तर माझ्या सारख्या शिवसैनिकाला ते सहन देखील होणार नाही.त्यामुळे ही भूमिका मला घ्यावी लागली असेही ते यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment