करजगी येथे संख महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या..भिवर्गीत वाळू ट्रँक्टर पसार.. - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, November 17, 2020

करजगी येथे संख महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या..भिवर्गीत वाळू ट्रँक्टर पसार..

करजगी येथे संख महसूल विभागाच्या पथकाच्या धाडी ..भिवर्गीत वाळू ट्रँक्टर पसार..

उमेश पाटील-सांगली

जत तालुक्यातील करजगी,भिवर्गी येथे संख महसूल विभागाच्या पथकाने धाडी टाकून वाळू ट्रँक्टर पकडला आहे.वाळू ट्रँक्टर जप्त करुन संख अप्पर तहसिलदार कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे.तर भिवर्गी येथे वाळूचा ट्रँक्टर पथकाची माहिती मिळाल्याने पलायन केला आहे. ही कार्यवाही शनिवारी पहाटे ३ वाजता करण्यात आली आहे.

 पूर्व भागात महसूल विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षाने बोर नदीपात्रात वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.भिवर्गी,बालगाव,हळ्ळी, करजगी,सुसलाद,सोनलगी,बेळोंडगी,संख ही गावे वाळू तस्करीचे प्रमुख केंद्र आहेत. संख अप्पर तहसिलदार कार्यालयाचे अप्पर तहसिलदार हणमंत मेत्रे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटे ३ वाजता नदी पत्रातील करजगी,भिवर्गी, सुसलाद,सोनलगी येथे धाडी टाकल्या आहेत. करजगी येथे वाळूने भरलेला कर्नाटक पासिंगचा के.ए २८.टी ७१४९.ट्रँक्टर आढळून आला.महसूल विभागाच्या पथकाने ट्रँक्टर,वाळू जप्त करुन अप्पर तहसिलदार कार्यालयात लावला आहे.भिवर्गी येथील वाळू तस्करांना पथक आल्याची माहिती मिळताच ट्रँक्टर पथकाच्या हतावर तुरी देत पलायन केले आहे. दिपावलीची सुट्टी आहे.कार्यालय सुरु झाल्यावर ट्रँक्टर मालकाचा शोध घेऊन नोटीस दिली जाणार आहे. त्याच्यावर गौण खनिज उत्खनन कायद्यानुसार दंड आकारणी केली जाणार आहे.तसेच यापुढेही वाळू तस्करीविरोधात कडक मोहिम राबविली जाणार आहे.अशी माहिती अप्पर तहसिलदार हणमंत मेत्रे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment