Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

चिपळुण मधील महाराष्ट्र मिररचे पत्रकार ओंकार रेळेकर पत्रकारिता पदविका परीक्षेत उत्तीर्ण

 चिपळुण मधील महाराष्ट्र मिररचे पत्रकार ओंकार रेळेकर पत्रकारिता पदविका परीक्षेत उत्तीर्ण

पत्रकारिता पदवी आणि मानवी हक्क अभ्याक्रमाचे निकाल जाहीर

 महाराष्ट्र मिरर टीम-चिपळूण 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरु असणाऱ्या पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम या दोन अभ्याक्रमाचे निकाल जाहीर असून दैनिक रत्नभूमी जर्नालिजम कॉलेज, रत्नागिरी सेंटरचा १००% निकाल लागला आहे.पत्रकारिता पदविकेत अभिजित जाधव तर मानवी हक्क शिक्षणक्रमात संपत पाटील ,जाकीर ऐनरकर जिल्ह्यात प्रथम आले आहेत, तर चिपळुनातील पत्रकार ओंकार रेळेकर  ९०% हुन अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल १५ दिवसाच्या आता जाहीर करण्यात आले आहेत. यातील पत्रकारिता क्षेत्रात उपयुक्त असणारा पत्रकारिता पदविका शिक्षणक्रम या कोर्सेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून अभिजित दिलिप जाधव हा विद्यार्थी प्रथम आला आला असून मानवी हक्क शिक्षणक्रमात जिल्ह्यातून संपत पाटील आणि जाकीर ऐनरकर हे प्रथम आले आहेत.

दरम्यान दोन्ही कोर्सला परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

पत्रकारिता पदविका मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम अभिजित जाधव (९९. ७५%), व्दितीय नितीश खानविलकर (९८. ७५%) तर तृतीय प्रसाद घाटे (९७. ७५%), सुमेध मुसळे (९७. ५०%), संदीप क्षीरसागर (९७%). तर  जाकीर ऐनरकर, प्रकाश हर्चेकर, निलेश मोरे, इशेद फर्नांडिस, हेमंत चव्हाण, रघुनाथ फुलमाळी, सचिन सावंत, श्रुतिका गुहागरकर, शशिकांत रमेश कांबळे, स्नेहा जाधव, रवींद्र मिसाळ, *ओंकार रेळेकर*, लक्ष्मण आखाडे हे सर्व विद्यार्थी ९०% पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.

मानवी हक्क शिक्षणक्रमामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम संपत पाटील (९७.६७) आणि जाकीर ऐनरकर (९७. ६७),  व्दितीय शीतल जाधव  (९७%) आणि  इशेद फर्नांडिस (९७%) तर तृतीय सुजाता चाळके (९६. ६७%), अश्विनी शेलार (९४.३३%), संतोष भुरटे (९३. ३३), तर प्रथमेश पालकर, स्नेहा जाधव, शशिकांत दत्ताराम कांबळे, एडु केकाण, श्रीकांत मुंडे, शरद खांडेकर, सुरेंद्र खताते, हृषिता तावडे, महेश शिंदे, सचिन तांबे, सुनील निर्मल, निलेश मोरे हे सर्व विद्यार्थी ८०% गुणांपेक्षा अधिक मार्क्सने उत्तीर्ण झाले आहेत.

दोन्ही अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे दैनिक रत्नभूमी जर्नालिजम कॉलेज, रत्नागिरीच्या केंद्रप्रमुख श्रीमती धनश्री धंनजय पालांडे आणि केंद्रसंयोजक श्री. अंकुश अशोक कदम यांच्या कडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies