राज्यपालनियुक्त जागांसाठीची नावे राज्यपालांकडे सुपूर्द
महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसंदर्भातील प्रस्ताव मागील आठवड्यात कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने आज माननीय परिवहनमंत्री अनिल परब यांनी महामहिम राज्यपाल यांची राजभवन येथे भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे विनंती पत्र तसेच कॅबिनेटने मागील आठवड्यात मंजूर केलेल्या प्रस्तावासह सर्व नावे सीलबंद पाकिटात राज्यपालांकडे सुपूर्द केली. ही नावे देताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यपाल लवकरच या नावांना मान्यता देतील अशी अपेक्षा देखील परिवहनमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment