ठाण्याच्या चारकोप पोलिसांनी दोन तासात एक वर्षाच्या मुलीच्या अपहरण करणाऱ्या टोळीस केले जेरबंद - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 3, 2020

ठाण्याच्या चारकोप पोलिसांनी दोन तासात एक वर्षाच्या मुलीच्या अपहरण करणाऱ्या टोळीस केले जेरबंद

 ठाण्याच्या चारकोप पोलिसांनी दोन तासात एक वर्षाच्या मुलीच्या अपहरण करणाऱ्या टोळीस केले जेरबंद

पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे आपल्या परिवाराला परत मिळाली बबीता

मिलिंद लोहार- मुंबई 


दि 3:11 2020 रोजी अकरा वाजता चारकोप ठाणे येथे राहणाऱ्या  सुनिता राजु गुरव 30 धंदा घरकाम राहणार अंबुज वाडी कारगिल गल्ली क्रमांक 4 मालवणी मालाड पश्चिम मुंबई यांनी पोलिस ठाण्यात जाऊन सांगितले की त्यांची एक वर्षाची बबिता ही मुलगी दिसून आली नाही म्हणून त्यांनी त्यांच्या पतीसोबत यांच्या मुलीचा शोधाशोध सुरू केला परंतु त्यांची मुलगी बबिता ही मिळून आली नाही

मात्र सतर्क पोलीस यंत्रणेने लगेच वरिष्ठांना विचारपूस करून तीन पथकांची नेमणूक करण्यात आली व आजूबाजूच्या परिसरात तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तांत्रिक तपास व गुप्त बातमीच्या आधारे अवघ्या दोन तासात सदर अपहरण करण्यात आलेली बालिका अंधेरी परिसरातून महिला आरोपीकडून सुखरूप ताब्यात घेण्यात आली

अटक करण्यात आलेले आरोपी सचिन महादेव येलवे वय 40 सुप्रिया-सचिन रेल्वे रश्मी रत्नाकर नायक ऊर्फ रश्मी राजू पवार वय 29 राजू मोहन पवार वय 36 यांना अटक करण्यात आली आहे

अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग दिलीप सावंत यांच्या आदेशानुसार पोलिस उप-आयुक्त दिलीप यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक चारकोप पोलीस स्टेशन ठाणे श्री विठ्ठल शिंदे पोलीस निरीक्षक लांगी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे पोलीस उपनिरीक्षक ढेंबरे व स्टाफ यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते

No comments:

Post a Comment