Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आज दुपारी अर्णव गोस्वामी यांना न्यायालयासमोर हजर करणार

 आज दुपारी अर्णव गोस्वामी यांना न्यायालयासमोर हजर करणार

अमूलकुमार जैन-अलिबाग


‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अर्णप गोस्वामी यांच्यावर अलिबाग पोली स ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. 

या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अर्णब  व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता. मुळचे कावीर येथे राहणारे अन्‍वय नाईक  हे मुंबईत व्‍यवसायानिमित्‍त राहत होते. अन्वय हे मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी ४ मे रोजी अन्वय कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली जी चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे अन्वय  नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. अर्णव गोस्वामी यांच्यावतीने अँड.गौरव पारकर न्यायालयात बाजू मांडणार आहेत. सकाळी 11.10 वाजता अलिबाग पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर एक तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीस ठाण्यातच मेडीकल करण्यात आली. दुपारनंतर अर्णव गोस्वामी यास न्यायालया समोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान अलिबागेत मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies