माथेरान पर्यटकांनी झालं फुल्ल,तोबा गर्दी
कोरोना सुरक्षिततेसाठी सर्व नागरिक पर्यटक मास्क, सॅनिटायझर,युक्त
चंद्रकांत सुतार माथेरान
येथील प्रमुख व्यावसायिक घोडे, हात रिक्षा, दुकानदार, हॉटेल व्यवसायीक लॉजिग धारक सद्याच्या पर्यटक हंगामा साठी सज्ज राहिले आहेत तोंडाला मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग, या सर्व गोष्टीची पालन करत आपला व्यवसाय करीत आहेत स्थानिक प्रशासनाने, पोलीस यंत्रणा कोरोना परिस्थिती सर्वच्या सहकार्याने उत्तम रित्या हाताळल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरान मध्ये आटोख्यात आणला
आज ही दिवाळीच्या पर्यटन हंगामात कोरोना परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत ,योग्य ती काळजी, सूचना वारंवार केल्या जात आहेत, सर्वच नागरिकांनी, पर्यटकांनी कोरोना परिस्थिती अनुभवली आहेच, त्या मुळे थोडी सी उसंत, मनाला ताजेतवाने रिचार्ज करण्यासाठी सर्व काळजी घेऊनच पर्यटक येत आहेत,त्याची तेवडीच काळजी ही माथेरान कर घेत आहेत, येथील शुद्ध हवा अल्हाददायक वातावरण निसर्गाचे वेगवेगळ्या किमया पाहून पर्यटक नक्कीच खुश होत आहेत ,