बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळाली पाहिजे -आदिती तटकरे
विजय गिरी -श्रीवर्धन
बेरोजगार तरुणांना विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी फिरते वाहन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये आश्या बेरोजगार तरुणांना सबसिडी शासन देणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगारांनी घ्यावा. फळ भाज्या, आईस्क्रीम इतर व्यावसायिक असतील त्याना ट्रान्सपोर्ट साठी लागणाऱ्या वाहनांचा यामध्ये समावेश असणार आहे. शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करून ती विक्रीसाठी आणण्यासाठी हे एक उत्तम माध्यम असणार आहे.-फिरते वाहन असल्यामुळे पार्किंगची अडचण देखील येणार नाही. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ खरच गरजूंना द्यावा. त्यासाठी नगरपालिकेत कार्यालय उभारण्याच्या सूचना यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी नगराध्यक्ष याना दिल्या.जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवायच्या आहेत. त्यादृष्टीने खेड्यात देखील कार्यालय स्थापन करण्याची गरज असल्याचं त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना श्रीवर्धन मधील प्रलंबित प्रश्नांबाबत बोलताना सर्व प्रलंबित प्रश्न सोडवणार आहोत मात्र सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात सरकारला जास्त भर द्यावा लागला त्यामुळे सरकारकडे निधी कमी आहे. तरीदेखील पुढील काळात सर्व प्रश्न सोडवले जातील. आस ठाम विश्वास यावेळी ना. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
पुढील काळात कोविडची दुसरी लाट येऊ शकते त्यामुळे मास्कचा वापर करा. श्रीवर्धन मध्ये मास्क चा वापर फार कमी प्रमाणात केला जात असल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे पुढील दोन दिवसांचा कालावधी द्या आणि तरी देखील कोण ऐकत नसेल तर दंडात्मक कारवाईला सुरवात करा अशा सूचना देखील यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी दिल्या