Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

'लव्ह जिहाद'च्या गुन्हेगारांना योगी आदित्यनाथ यांच्या इशाऱ्यावरून शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

 'लव्ह जिहाद'च्या गुन्हेगारांना योगी आदित्यनाथ यांच्या इशाऱ्यावरून शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी *लव्ह जिहादच्या* निमित्ताने एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, यांनी सुद्धा

हरियाणा राज्यात कायदा करण्याबाबत विचार मांडलेला आहे. लव जिहादच्या विषय निवडणुकीच्या प्रचाराचा  होऊ शकत नाही.

 महत्वाचे म्हणजे काही  वेळेला अल्पवयीन मुलींवरती दबाव आणून किंवा फूस लावून धर्म बदलण्यासाठी भाग पाडलं जाते.असं ठरवून मुलींना पळवणार्या टोळ्या भारतातच नव्हे तर अख्या जगात सर्वत्र आहेत. अनेक वेळा अतिरेकी विचारासाठी या अल्पवयीन मुलींचा  उपयोग केला जातो ,त्यांचा थांगपत्ताही लागत नाही.तिच्याकडे बघत असताना एक जणू काही मुलं जन्माला घालण्याच्या मशीन आहे अशी  त्याच्याबद्दलची भूमिका असते म्हणून हा मुद्दा महत्वाचा असला तरी पण त्याच वेळेला हे देखील विसरता कामा नये अठरा वर्षाच्या वरच्या वयोगटातील मुलगी व २१वयाच्या वरील मुलगा  अशा  असणाऱ्या दोन व्यक्ती हे स्वतःच्या इच्छेनुसार कुठल्याही जातीत व कुठल्याही धर्मात लग्न करु शकतात,स्वतःचा संसार करू शकतात. म्हणून  याबद्दल निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा तात्पुरता घेऊन सोडून देण्यापेक्षा अल्पवयीन मुलींचे हिताच्या भुमिकेतुन व धर्मांतरासाठी केली जाणारी सक्ती या चौकटी मधून विषय पाहिला जावा असे  वाटते.म्हणून जे स्वच्छेने विवाह करताय आणि जिथे कुठलाही दबाव नाही त्या लोकांना भरडले जाऊ नये हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies