विटा शहर स्वच्छतेत अव्वल ठरणार : किरण तारळेकर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, November 2, 2020

विटा शहर स्वच्छतेत अव्वल ठरणार : किरण तारळेकर

 विटा शहर स्वच्छतेत अव्वल ठरणार : किरण तारळेकर

उमेश पाटील -सांगली

विटा शहराने स्वच्छतेत सलग तीन वर्षे देशपातळीवर उल्लेखनीय काम करत सन्मान मिळवला आहे. स्वच्छतेच्या मोहीमेत सातत्याने नागरिकांनी योगदान दिले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्येही विटा शहराला देशात प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया. यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन शहर स्वच्छतेच्या मोहीमेत योगदान द्यावे, असे आवाहन तारळेकर यांनी केले.

स्वच्छ सर्वेक्षण 2021 निमित्ताने विटा शहरात विविध उपक्रम करण्यासंदर्भात नगरपालिकेच्या लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात बैठक पार पडली. स्वच्छता दूत वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष ॲड अजित गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले, शहरात स्वच्छतेची मोहीम युध्द पातळीवर सुरु आहे. विविध उपक्रम दररोज शहरात होत आहेत. नागरिकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे. सध्या शहराला स्वच्छतेचे मॉडेल शहर म्हणून देशपातळीवर अव्वल क्रमांक मिळवण्याचा निर्धार केला आहे. शहरातील रस्ते सुशोभिकरण, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती अ़ॉनलाईन वेबसभा, कोपरा सभा असे विविध उपक्रम हाती घेतले आहेत. नागरिकांनी स्वच्छतेच्या लोकचळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले

यावेळी अविनाश चोथे म्हणाले, शहरातील नागरिकांनी कचरा वर्गीकरण करणे महत्त्वाचे आहे. वर्गीकृत कचरा घंटागाडीत देणे ही आपलीच जबाबदारी आहे.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी काळजी घ्यावी व माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस सहकार्य करावे. शहरामध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदी आहे. व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. नागरिकांनी आपला परिसर दररोज स्वच्छ ठेवावा. नागरिकांनी घरातील ओल्या कचऱ्यपासून घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करावे, असे आवाहन केले.

   यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय तारळेकर, आरोग्य सभापती फिरोज तांबोळी, नगरसेवक सुभाष भिंगारदेवे, भरत कांबळे, शिक्षण सभापती ॲड विजय जाधव, गजानन निकम, मुख्याधिकारी अतुल पाटील, कार्यालयीन अधिक्षक बाजीराव जाधव, आरोग्य निरीक्षक आंनदा सावंत यांच्यासह कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment