भारतीय जनता पार्टी हा पक्ष हवेवर चालणारा असेल तर राष्ट्रवादी कॉग्रेस हा झोपेत चालणारा पक्ष -चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
पदवीधर मेळाव्या दरम्यान माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांच्या वक्तव्यानंतर दिलं प्रतिउत्तर
मिलिंद लोहार-पुणे
राज्यातील वाढीव वीज बिलाबाबत आरोप प्रत्यारोप होत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यातील लोकांना वाढीव आलेली वीज बीले भरावी का..? 600 रुपयांचे बील 6 हजार आले,700 रुपयांचे वीज बील 21 हजार आले आहे हि वीजबीले लोकांनी भरावी का..आणि तुम्ही म्हणता वीज बीलांचे निर्णय आधीच्या सरकारने केलेय मग आधीच्या सरकारने केले मग आता सरकार तुम्ही डोक्यावर घेतले कशाला... मागच्या सरकारने पाहिले असते असं म्हणत आमच्यात धमक आहे आम्ही सक्षमपणे निर्णय घेतले असते (नाचता येईना अंगण वाकडं )अशा शब्दात सरकारला चिमटा काढत वीज बिलाबाबत सरकारला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी लक्ष केले