मायणी ते म्हासुर्णे (पंढरपूर - मल्हारपेठ) रस्त्याची प्रचंड दुरावस्था - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

मायणी ते म्हासुर्णे (पंढरपूर - मल्हारपेठ) रस्त्याची प्रचंड दुरावस्था

 मायणी ते म्हासुर्णे (पंढरपूर - मल्हारपेठ) रस्त्याची प्रचंड दुरावस्था.

मिलींदा पवार -खटाव सातारा


महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक १४३ आहे. स्वातंत्र्य मिळून सत्तरपेक्षा जास्तीचा कालावधी गेला व  जवळजवळ १४पेक्षा जास्त पंचवार्षिक योजना होऊन जावूनसूद्धा हा महामार्ग कांही ठिकाणी पांदितुन जाताना  परिस्थिती असते  तसी लाजिरवाणी अवस्था झाली आहे. या परीसर कराड व खटाव-माण या दोन मतदार संघाच्या सिमेवरचा भाग असल्याने नेहमीच दुर्लक्षित राहीला आहे. याला कोणीही वाली उरलेला दिसत नाही.  

रस्ते विकास महामंडळ, पीड्बल्युडी, स्थानिक प्रशासन या दुरावस्था कडे लक्ष कधी देणार? रस्त्याचे टेंडर निघण्यासाठी एवढा वेळ का लागतोय? या रस्त्यावर प्रचंड अवजड वाहणे, तसेच ऊसाचे ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली यांची वाहतुक करणारी वाहणे औंध, रायगाव, गोपुज, पडळ, उदगिरी, व सह्याद्री साखर कारखाना येथे ऊसाची वाहतुक होत असते. या बिकट परिस्थितीतुन वाहणे चालवणे जिकीरीचे तरी आहेच पण धोकादायकही आहे. तरी या महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे चालु होईल याकडे लक्ष द्यावे ही या परिसरातील जनतेची मागणी आहे.


No comments:

Post a Comment