जय हनुमान सेवा मंडळ वदप यांच्या वतीने किल्ले तयार करणे व रांगोळी स्पर्धेचे आयोजन
दिनेश हरपुडे-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
तसेच आपल्या तालुक्यातील गरीब आदिवासी मुलांना दिवाळी फराळ मिळावा यासाठी तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोभेवाडी कर्जत विद्यार्थ्यांना रविवार दिनांक १५/११/२०२० रोजी फराळ वाटप करण्यात आला .
जय हनुमान सेवा मंडळ यांच्यावतीने घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत रांगोळी प्रथम क्रमांक प्रणाली पाटील, द्वितीय क्रमांक ममता भोईर, तृतीय क्रमांक किरण क्षीरसागर व किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक नैमिषा दळवी, द्वितीय क्रमांक अर्चना पाटील व तृतीय क्रमांक तनिक्षा पाटील यांनी क्रमांक पटकावला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विजेत्यांसाठी स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे शाहीर श्री गणेश ताम्हाणे गावातील श्री सुरेश पाटील , कैलास पोटे , खंडू शिंदे, मनोहर भोपतराव ,भगवान चव्हाण , मारुती भोईर ,नीलिकेश दळवी, कृष्ण चव्हाण, सुभाष पाटील व जय हनुमान सेवा मंडळातील श्री समीर येरूणकर, अजित पाटील, विकास चव्हाण, प्रकाश चव्हाण, राहुल भोईर, सचिन चव्हाण, रोहिदास येरूनकर ,श्याम शिंदे, अतुल पवार, नितीन येरूनकर, संदीप चव्हाण, नयनीश दळवी, सचिन मंडलिक, वैभव भोपी, वैभव मुळे, गणेश पारठे, विजय चव्हाण,दिलीप वेखंडे अमित शिंदे हे उपस्थित होते.