Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खोपोली जवळील साजगाव येथील कंपनीत स्फोट, एक महिलेचा मृत्यू

आताची सर्वात मोठी बातमीखोपोली जवळील साजगाव येथील कंपनीत स्फोट, एक महिलेचा मृत्यू

आगीचा आगडोंब सुरूच,पोलीस,अग्निशमन दल यांचे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूअपघातग्रस्तांच्या मदतीला टीमचीही मदतखोपोली साजगाव येथील एका कंपनीत स्फोट होऊन शेजारी राहणारी एक महिला यात मृत्युमुखी पडली आहे,स्फोट इतका भयानक होत आहेत की त्याचे हादरे 3 ते चार किलोमीटर पर्यंत जाणवत आहेत.परिसरातील वीज पुरवठा ही खंडीत करण्यात आला आहे.
स्फोट झालेल्या कंपनीच्या बाजूला असलेल्या कंपनीला आगीचा वेढा, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू.खोपोली नगरपरिषद, टाटा स्टील भुषण, उत्तम स्टील, HPCL (2), रिलायन्स (2), कर्जत नगरपरिषद अश्या 8 फायर ब्रिगेड पथक घटनास्थळी दाखल....
DYSP शुक्ला साहेब, खोपोली पोलीस निरीक्षक क्षीरसागर साहेब, API असवरे साहेब,  PSI वळसगं साहेब सह खोपोली व खालापुर स्टेशनचे अमंलदार वर्ग मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल.
अजूनही मोठ्या प्रमाणात डोळ्यात जळजळ होत असून शेजारील परिसरात श्वास घ्यायला त्रास होत आहेPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies