पनवेल -भीमाशंकर मार्गासाठी सुनील गोगटेंचे नितीन गडकरींना निवेदन
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
चार जिल्ह्यांना जोडणारा भीमाशंकर रस्ता हा लालफितीत अडकून पडल्याने व अर्धवट अवस्थेत राहिलेल्या या रस्त्याला कोणीवाली नसल्याने हा रस्ता "राष्ट्रीय महामार्ग" म्हणून घोषित करावा व त्याचे रखडलेले काम लवकर मार्गी लागावे असं निवेदन भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन मागणीचे निवेदन दिलं.
पनवेल ,नेरे ,माळडुंगे ,नेरळ ,कशेळे ,सावळे, तळपेवाडी वांद्रे ,आंबोली ,कुडे ,घोटेवडी ,शिरगाव ,तळेघर ,भीमाशंकर ,खेड शिरूर रस्ता राज्यमार्ग क्रमांक 103 हा रस्ता पनवेल येथून सुरू होत असून रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि कर्जत तालुक्यातून जातो पुढे पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव तालुक्यातून जात असून राजगुरू नगर येथे पुणे नाशिक महामार्गाला छेदून पुढे शिरूर येथे शिरूर अहमदनगर मार्गाला मिळतो.सदर रस्त्यामुळे चार जिल्हे जोडले जातात.आज जे मार्ग आहेत त्यांनी याठिकाणी जातानाचे अंतर हेे ६0किमीने कमी होणार आहे या मार्गामुळे भीमाशंकर हे बारा जोतिर्लिंगापैकी एक असून तेथे देश विदेशातून भाविक येत असतात . तसेच येथील शेतीमाल नवी मुंबई येथे येतो हा रस्ता झाल्यामुळे भाजीपाला फळे यांना चांगला भाव या ठिकाणी मिळेल त्याच प्रमाणे रस्त्यावरील गावांना पर्यटन आणि इतर व्यवसायात फायदा होईल. हा रस्ता राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो सद्य परिस्थितीत राज्य सरकार हा रस्ता करू शकत नाही किंवा त्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून तो रस्ता लवकर करावा ही मागणी आज सुनील गोगटे यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना दिल्ली येथे निवेदन देऊन केली.
हा महामार्ग चार जिल्हातील लोकांसाठी विकासमार्ग ठरेल विशेष करून कर्जत खालापूर मतदारसंघातील लोकांना याचा मोठया प्रमाणावर रोजगार उद्योग धंद्यासाठी वरदान ठरणार आहे असंही गोगटे यांनी निवेदनात म्हटलं आहे.
उरण भिमाशंकर राज्यमार्ग क्र 54 आहे
ReplyDeleteकर्जत भिमाशंकर संघर्श समिती यांच्या माध्यमातून 20 वर्ष या रस्त्यासाठी संघर्ष चालू आहे या समितिच्या माहिती प्रमाने राज्यमार्ग क्र 54 आहे...
उरण भिमाशंकर मार्ग झाला पाहीजे आशी आमची मावळ ता खेड ता कर्जत ता आंबेगाव तालुक्याती सर्वाची मागणी आहे रस्ता झालाच पाहीजे
ReplyDelete