मुंबई - गोवा महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कोलाड पोलिस स्टेशन निरिक्षकपदी सुभाष जाधव यांची नियुक्ती
अरुण जंगम-म्हसळा
कोलाड परिसरात विविध ठिकाणी नागरिकांचे वास्तव्य वाढत चालले आहे.त्यामुळे येथे लोकसंख्या सुद्धा वाढताना दिसत आहेत.या वाढत्या लोकसंख्या बरोबरच या परिसरात गुन्हे शाखेच्या घटना,महामार्गावर सातत्याने होणारे अपघात चोऱ्या ,महिला,मुलींची छेड़ छाड,आदी घटना घडत आहेत, त्यातच कोलाड पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांची नवी मुबंई येथे बदली झाल्याने रोहे पोलीस ठाण्यात सेवेत असणारे सुभाष जाधव यांची नवनिर्वाचित कोलाड पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जाधव यांची कोलाड येथे नियुक्ती होताच मी व माझी संपूर्ण टीम सदैव येथील जनतेच्या संरक्षण साठी तत्पर राहणार असल्याची प्रतिक्रिया,नवनिर्वाचित कोलाड पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांनी पत्रकारांना दिली आहे .यावेळी पोलीस कर्मचारी बेदुगडे,तडवी उपस्थित होते.