माथेरानमध्ये पोलीस शिपाईची दुकानदारास मारहाण,
वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराला धक्काबुक्की आणि शिवीगाळ
चंद्रकांत सुतार- माथेरान
शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास शिल्लक खाण्याच्या पानावरुन दुकानदार बिलाल महापुळे यांना पोलीस शिपाई शाम जाधव यांनी शिवीगाळ, व काठीने मारहाण केली, लॉकडाऊन नंतर 9 महिन्यांनी माथेरान हळूहळू सुरू झाले त्यातच माथेरान पर्यटनचा महत्वाचा सिझन म्हणजे दिवाळी सिझनकडे पाहिले जाते, सद्या दिवाळीचे सिजन सुरू आहेच त्यामुळे सर्व व्यावसायिक आपल्या काम धंद्यात व्यस्त असताना शुक्रवारी रात्री 11 वाजता शिल्लक कारणावरून पोलीस शिपाई शाम जाधव यांनी दुकानादार बिलाल महापुळे यांना मारहाण केली, दुकानदार बिलाल महापुळे हे आपले पानांचे दुकान बंद करून घरी निघाले असताना तेथे मद्यधुंद अवस्थेत पोलीस शिपाई श्याम जाधव आले नी बिलालकडे पानाची मागणी केली , त्यावर बिलाल यांनी त्यांना पानांची कात व चुन्याची भांडी आता धुतली आहे , दुकान बंद झाले आहे, तरी दुसरे काही पाहिजे असेल तर देतो असे सांगितले असता , जाधव शिपाई यांनी दुकानंदार बिलाल यांना शिवीगाळ करत, काठीने मारहाण केली, पोलीस शिपाई यावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांच्या सोबत असलेल्या कॉन्स्टेबल जोशी यांनी समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु जाधव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, रात्री याबाबत सर्व जमाव जमल्याने जाधव पोलीस यांची मेडिकल करण्यासाठी माथेरान बी जे हॉस्पिटलमध्ये जात असताना या सर्व घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी येथील महाराष्ट्र माझाचे प्रतिनिधी दिनेश सुतार गेले असता त्यांनाही जाधव यांनी धक्का बुक्की केली
, पत्रकार दिनेश सुतार यांनी तशी लेखी तक्रार माथेरान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे, पोलिसच जर शिल्लक कारणाने दारूच्या नशेत असे नागरिकाना त्रास द्यायला लागले तर नक्की विश्वास ठेवायचा कोणावर, असा संतप्त सवाल माथेरानकर विचारत आहेत.
20 तारीख शुक्रवारी रात्री झालेल्या घटनेची माहिती वरिष्ठ अधीकाऱ्यांना कळविली आहे त्याबाबत वरिष्ठ अधिकारी योग्य ती कारवाही करतील
प्रशांत काळे,
एपीआय माथेरान पोलीस स्टेशन
माथेरान व्यापारी संघटनेचे सदस्य बीलाल महापुळे याच्यावर झालेल्या अन्याया बाबत व्यापारी संघटना त्याच्या पाठीशी सक्षम उभी आहे आम्ही माथेरान पोलीस स्टेशनचे सहाय्यक प्रशांत काळे साहेबांशी बोलणे केले असून पोलीस शिपाई श्याम जाधव यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे,
राजेश चौधरी-
अध्यक्ष व्यापारी संघटना, माथेरान
----------------------------------------