द्रोणागिरी गडावर सापडले नवीन अवशेष.
गडावरील इतिहासकालीन झोकाळलेल्या वास्तूंना मिळणार नव्याने उजाळा.
अमूलकुमार जैन-मुरुड
दुर्ग मावळा प्रतिष्ठान साधरण दोन वर्ष द्रोणागिरी गडावर श्रमदान मोहिमे द्वारे सातत्यपूर्ण संवर्धन कार्य राबवत आहे. याच संवर्धन कार्यास अनुसरून गेल्या काही दिवसात सातत्याने शोध मोहीम राबवल्या जात होत्या. उरण मधील जुने जाणकार तसेच प्रतिष्ठान मधील स्थानीक सदस्य व संवर्धन विभाग प्रमुख व उरण विभाग प्रमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर होतकरू सदस्यांनी सहभाग घेत काही इतिहासकालीन जुने अवशेष हुडकून काढले आहेत. त्यामुळे उरणच्या इतिहासात आता नक्कीच नवीन माहितीची, ज्ञानाची भर पडणार आहे.
शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक अनेक गुप्त गोष्टींचा उलगडा होण्यास यामुळे मदत होणार आहे. आतापर्यंत दुर्ग मावळा प्रतिष्ठानने अनेक मोहिमा द्रोणागिरी किल्ल्यावर राबवून, स्वच्छतेचे काम हातात घेऊन किल्ल्यावरील अनेक बाबी उजेडात आणल्या आहेत.दुर्ग मावळ्यांनी केलेल्या पायवाट मुळे सरळ किल्ल्यावर जाणे आता सोप्पे झाले आहे.एकंदरीतच अनेक महत्वाची कामे दुर्ग मावळाने या द्रोणागिरी किल्ल्यावर केले आहे. त्याच्या या कार्याचे फलित म्हणून अनेक नवीन अवशेष या किल्ल्यावर सापडले आहेत.पुन्हा एकदा स्थानीक होतकरू सद्यस्यांच्या वाखाणण्याजोग्या दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या शोध मोहिमेच्या कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा निरपेक्ष भावनेने प्रसार व प्रचार करणे, गड किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण करणे हे दुर्गमावळा प्रतिष्ठानचे मुख्य उद्दिष्ट व ध्येय असल्याचे मोहिमेदरम्यान उपस्थित असलेले दुर्गमावळा प्रतिष्ठानचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश तांडेल यांनी सांगितले.
खुप छान कार्य केले आहे सद्याच्या मोबाईल व इतर गोष्टीच्या आहारी गेलेला तरुण वर्गाने मावळ प्रतिष्ठन येतील तरुण वर्गाने श्रमदानातून केलेल्या शोध मोहीम मुळे शिवाजी महाराजांच्या
ReplyDeleteकिल्ल्याच्या अनेक बाबी समोर येण्यास मदत होईल खुप छान कार्य