म्हसळ्यामध्ये लाकडाच्या दुकानाला आग:७० हजारांचा माल जाळून खाक
अरुण जंगम-म्हसळा
म्हसळा शहरातील दिघी रोड परिसरात असणार्या नथुराम कदम यांच्या लाकडाच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे १ च्या सुमारास आग लागली.या आगी मध्ये ७० हजारांचा माल जळाला असल्याची माहिती कदम यांनी दिली.
शहरातील दिघी रोड परिसरात नथुराम कदम यांचा लाकडापासून खेळणी बनवण्याचा दुकान आहे.या दुकानाला शुक्रवारी पहाटे शॉर्टसर्किट मुळे आग लागली.पोलिस राहुल राठोड व परिसरातील नागरिकणा या आगीची माहिती मिळाल्या नंतर त्यांनी आग भयाण रूप घेण्या आधीच आटोक्यात आणली.या आगी मध्ये दुकानातील ग्रँडर,कटर मशीन व इतर समान पकडून तब्बल ७० हजारांचा माल जळाला आहे.