म्हसळ्यात स्कूटीच्या धडकेत प्रवासी रिक्षा पलटी: दोन जखमी
अरुण जंगम-म्हसळा
म्हसळा तालुक्यातील खरगाव बुद्रुक गावाजवळ रिक्शा व स्कूटी मध्ये भीषण धडक झाली असून या अपघातात २ जन गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.
एक तरुण खरगाव बुद्रुक गावाच्या दिशेने म्हसळा येथे स्कूटी घेऊन जात असताना म्हसळा येथून प्रवासी वाहतूक घेऊन पाभरा येथे जाणार्या रिक्षाला त्याने भीषण धडक दिली.धडक एवढी भीषण होती की,रिक्षा पलटी होऊन रिक्षा आणि स्कूटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या अपघातात स्कूटी चालक दत्तात्रेय निगुडकर वय अंदाजे १९ वर्षे व रिक्षामधील प्रवासी संदेश महादेव पाटील हा गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे.म्हसळा येथे प्राथमिक उपचारानंतर या जखमींना पुढील उपचारासाठी माणगाव येथील दवाखान्यात पाठवण्यात आले.