जिल्हाध्यक्षपदी पत्रकार दीपक शिंदे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 10, 2020

जिल्हाध्यक्षपदी पत्रकार दीपक शिंदे

 नॅशनलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या 

जिल्हाध्यक्षपदी पत्रकार दीपक शिंदे

ओंकार रेळेकर-चिपळूण


नॅशनलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या ग्राहक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील पत्रकार दीपक शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. 

     नॅशनलिस्ट कंझ्यूमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पाठक व रत्नागिरी महिला जिल्हाध्यक्षा  रंजिता ओतारी‌ यांनी ही निवड केल्याचे घोषित केले आहे, संघटनेने आपल्याला दिलेली  जबाबदारी आपण उत्तमरित्या पार पाडू, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करून त्यांना न्याय मिळवून देऊ असे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. दीपक शिंदे हे अनेक वर्षे पत्रकारितेबरोबर सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment