Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्ज वाटपात जामिन किंवा तारण घेण्याची शिफारस नसल्यास त्याची मागणी करुन ग्राहकांना त्रास देवू नये :जिल्हाधिकारी शेखर सिंह

 कर्ज वाटपात जामिन किंवा तारण घेण्याची शिफारस नसल्यास त्याची मागणी करुन ग्राहकांना त्रास देवू नये :जिल्हाधिकारी शेखर सिंह

प्रतीक मिसाळ -सातारा


शासकीय योजनांच्या कर्ज वाटपात जामिन किंवा तारण घेण्याची शिफारस नसले तरी काही बँका जामीन व तारण मागून विनाकारण ग्राहकांना त्रास देण्याचे प्रकार समोर येत आहेत , असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची खबरादारी सर्व बँकांच्या व्यवस्थापकांनी घ्यावी , अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केल्या . जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी ते बोलत होते . या बैठकीला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , महाराष्ट्र बँकेचे अंचल प्रबंधक अपर्णा जोगळेकर नाबार्डचे सुबोध अभ्यंकर , जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदी उपस्थित होते . महामंडळाकील प्रकरणे आहेत ती तातडीने निकाली काढावीत , तसेच जी पेंडींग आहेत त्याची माहिती सादर करावी अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले खरीप हंगामामध्ये 105 टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते आहे . रब्बीचेही वाटप बँकांना दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे करावे . ज्या शासकीय योजना बँकांमार्फत राबविण्यात येतात त्या प्रभावीपणे राबविण्यात याव्यात . आर्थिक साक्षरता करावी  ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी वर्तमानपत्रे व आकाशवाणी यांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता करावी व लोकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे यासाठी बँकांनी योग्य ती माहिती द्यावी , अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत केल्या . या बैठकीस विविध बँकांचे जिल्हा समन्वयक व शासकीय अधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies