मुरुड तालुक्याला हमी भावाने भात खरेदी केंद्र सुरु करा ! किसान क्रांती संघटनेची मागणी
अमूलकुमार जैन-मुरुड
या निवेदनात आधार भूत खरेदी योजनेअंतर्गत फेडरेशन मुंबई यांच्या नियुक्त केलेल्या जिल्हा मार्केटिंग रायगड यांच्या मार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम सन २०-२१ मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग,पेण,पनवेल,खालापूर,कर्जत,सुधागड रोहा श्रीवर्धन माणगाव,महाड,पोलादपूर म्हसळा.या तालुक्यांतील,३५ मंजूर धन खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.अशी माहिती शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे,या जाहीर केलेल्या यादीत मुरुड तालुक्याचा कोणताही उल्लेख नाही.त्यामुळे आमचा तालुका वगळयाची खंत व्यक्त करून मुरुड तालुक्याला हमी भावाने भात खरेदी केंद्र सुरु करा अन्यथा आम्हाला मोठे जनआंदोलन करावे लागेल असा इशारा किसान क्रांती संघटने कडून देण्यात आला आहे.
याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना किसान क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी सांगितले कि,संपूर्ण रायगड जिल्ह्यातून मुरुड तालुक्याला वगळण्यात आले आहे.सर्वात जास्त भात उत्पादन मुरुड तालुक्यात घेतले जाते.हमी भावाने भात खरेदी केंद्र असेल तर शेतकऱ्याच्या भाताला चांगला भाव मिळू शकणार आहे.भाव चांगला मिळाल्यास शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्नात वृद्धी होणार आहे.परंतु मुरुड ला वगळले याचा संताप येत आहे.सर्व ठिकाणी भात केंद्र फक्त मुरुडला का नाही लवकरात लवकर भात केंद्र सुरु न केल्यास आम्ही जन आंदोलन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.