पोलीस निरिक्षक प्रदीप देशमुख माणगांव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, November 12, 2020

पोलीस निरिक्षक प्रदीप देशमुख माणगांव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी

 पोलीस निरिक्षक प्रदीप देशमुख माणगांव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी

रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव 


माणगांव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणुन पोलिस निरिक्षक  प्रदीप बाळासाहेब देशमुख यांनी नुकतेच पदभार स्विकारला आहे. या आधी गुन्हे अन्वेषण विभागात ते कार्यरत होते यापूर्वीचे माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक रामदास इंगवले पुणे पिंपरी-चिंचवड येथे बदलुन गेले आहेत. पो. नि. प्रदिप देशमुख यांची बुधवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रायगडचे पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांचे आदेशानुसार माणगांव पोलीस ठाणे (प्रभारी) अधिकारी म्हणुन नेमणुक झाली आहे.  नवनियुक्त पोलीस निरिक्षक देशमुख हे काल माणगांव पोलीस ठाण्यात हजर होताच सहाय्यक पोलीस निरिक्षक सुर्वे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

No comments:

Post a Comment