शैलेश दादा मोहिते यांचा पुणे पदवीधर मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, November 14, 2020

शैलेश दादा मोहिते यांचा पुणे पदवीधर मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल

 शैलेश दादा मोहिते यांचा पुणे पदवीधर मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल

मिलिंद लोहार- पुणे


पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे अनेक दिग्गज पुणे पदवीधर मतदारसंघात आपले नशीब आजमावत आहेत त्यातच 12 तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे उमेदवारांची अर्ज भरण्यास गर्दी केली होती त्यातच सातारा जिल्ह्यातील युवा नेतृत्व शैलेश दादा मोहिते अध्यक्ष साई मेडिकल फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट  यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला शैलेश दादा मोहिते गेले वीस वर्षापासून जनसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणून काम करत आहेत अनेक सामाजिक उपक्रम ही त्यांनी राबवले आहेत पुणे पदवीधर मतदार संघामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश होतो सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही साधारण निवडणुकीपेक्षा वेगळी असते मतदारसंघांमध्ये जनजागृती करून त्यांना मतदान करण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असते दरम्यान शैलेश दादा मोहिते यांनी गेल्या पाच वर्षापासून आपल्या प्रबळ उमेदवारीच्या जोरावर आपली ताकत या पाच जिल्ह्यांमध्ये लावली आहे ग्रामीण भागातील मतदारांना निवडणूक व उमेदवारांना बाबत परिचय करून देण्यासाठी शैलेश दादा मोहिते यांची संपूर्ण टीम कामाला लागली आहे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे   त्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे त्यांच्या अडचणी जाणून घेणे तसेच आपले ध्येय व उद्दिष्टे पटवून देण्यावर त्यांनी जास्त भर दिला आहे अनेक पदवीधरांची त्यांनी नोंदणी करून घेतली आहे तसेच ग्रामीण व शहरी भागातील पदवीधरांना येणाऱ्या समस्या सोडवण्यात ही शैलेश दादा मोहिते  यांना यश आले आहे पदवीधरांच्या   आग्रहा खातिर आपण फॉर्म भरत आहोत असे शैलेश दादा मोहिते यांनी सांगितले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व अटींचे  पालन करून अर्ज भरण्यात आला यावेळी रणजीत पाटील नितेश मोहिते व शैलेश दादा समर्थक उपस्थित होते  त्यामुळे यावेळी ची  पुणे पदवीधर निवडणूक नक्कीच चुरशीची रंगणार आहे

No comments:

Post a Comment