महाडचे तिघे दापोली समुद्रात बुडाले
महाराष्ट्र मिरर टीम
महाड सुतार आळी येथून 8 जण पर्यटनासाठी दापोली जवळील पाळंदे समुद्रकिनारी गेले असता त्यातील तिघे जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली असून ऐन दिवाळीत महाड शहरात शोककळा पसरली आहे.
महाड येथून आठ जण पर्यटनासाठी डेम्पोने दापोली येथील पाळंदे येथे गेले असता दीपक सुतार,यश पवार आणि प्रसन्नजित तांबे हे तिघे बुडाले ,सुदैवाने त्यातील यश पवार हा सुखरूप बचावला आहे तर दीपक सुतार याचा मृतदेह सापडला असून प्रसन्नजीत तांबे बेपत्ता आहे.दापोली पोलीस आणि स्थानिक नागरिक शोधकार्य करत आहेत.ऐन दिवाळीत या दुर्दैवी घटनेने महाड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.