गुरुकुलच्या 'शिक्षक आपल्या दारी' सप्ताहाचा किलज येथे समारोप.
महाराष्ट्र मिरर टीम-तुळजापूर
कोरोना संक्रमण झाल्यामुळे शाळा मागील आठ महिन्यापासून बंद आहेत.विद्यामंदिराच्या वतीने नियमित ऑनलाईन तासिका घेतल्या जातात,अभ्यास दिला जातो,स्वाध्याय घेतला जातो या सर्व बाबीची तपासणी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक डॉ जितेंद्र कानडे यांच्या संकल्पेतून 'शिक्षक आपल्या दारी' अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील फुलवाडी,धनगरवाडी,सराटी,बाभळगाव,केरूर,इटकळ,उमरगा,चिवरी,नळदुर्ग,फुलवाडी,जळकोट, सिंदगाव,शहापूर,दहिटणा, खुदावाडी,होर्टी,किलज,चिकुंद्रा, आष्टा,आष्टामोड या सह ३२ गावातील सर्व विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणाला आहे.
या संकल्पनेतून ऑनलाईन 'गुगल मीट','झूम मीट',व्हाॅटसअप व्दारे झालेले अध्यापन समजले का ?गणित,इंग्रजी,विज्ञान या विषयातील काही समस्या संबंधी चर्चा करण्यात आली.त्यांनी आता पर्यंत केलेला अभ्यास तपासण्यात आला.या संकल्पनेतून विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाऊ नये,ताणतणावात राहू नये,सहज व आनंदीपणाने अध्ययन करावे,परीक्षेबद्दल भीती बाळगू नये,दररोज लेखन,वाचन या बाबी होणे अपेक्षित आहे.पालकांशी चर्चा करून त्यांना अभ्यास घेण्याविषयीच्या सूचना देण्यात आल्या.प्रत्येक पालकांच्या मोबाईलमध्ये होम रिव्हज कंपनीचा अँप डाउनलोड करून देण्यात आला आहे तो कसा वापरावा याची माहिती यावेळी देण्यात आली.
याचा समारोप किलज येथे करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण नरे,संतोष मोकाशे, सुरेश गायकवाड, शिवराज भुजबळ,रामेश्वर सावंत,किशोर जाधव,ज्ञानेश्वर बंडगर यांनी सहभाग घेतला. विद्यामंदिराच्या या उपक्रमाचे पालकातून स्वागत करण्यात आले.यावेळी किलज येथील कालिदास जलकोटे यांनी शिक्षकांचा सत्कार करून अभिनंदन केल.