कोविड-19, निसर्ग चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी सन्मानित
अमूलकुमार जैन-अलिबाग
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त असलेले जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग हे कार्यालय शासनाच्या विविध योजना तसेच ध्येय-धोरणे यांची प्रसिद्धी करुन ही माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करते. शासन, प्रशासन, जनता आणि प्रसारमाध्यमे यामधील दुवा साधण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालयाकडून केले जाते.
कोविड-19, निसर्ग चक्रीवादळ व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून या कार्यालयाची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. या संकटकाळात शासन व प्रशासनाने जनतेसाठी दिलेल्या महत्वाच्या सूचनांचे, माहितीचे, मार्गदर्शक तत्वांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून जिल्हा तसेच राज्य स्तरावरील प्रसारमाध्यमांना वेळोवेळी तत्परतेने देण्यात आली. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, यू-ट्यूब यासारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही जनतेसाठी आवश्यक ती माहिती प्रभावीपणे पाठविण्यात आली. यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यासह जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींनीही मोलाचे सहकार्य केले. तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही उत्तम साथ लाभली. त्याचप्रमाणे विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयातील दूरमुद्रणचालक-नि-टंकलेखक विठ्ठल बेंदुगडे, लिपिक-नि-टंकलेखक सचिन काळुखे, लिपिक-नि-टंकलेखक निशा कदम, सिनेयंत्रचालक धनंजय कासार, सिनेयंत्रचालक जयंत ठाकूर, संदेशवाहक शशिकांत भोसले, प्रसाद ठाकूर यांना नुकतेच जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, खालापूर मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले