वाई पोलीस ठाणेकडील घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघड
प्रतीक मिसाळ- वाई
अजयकुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा , धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्याने , आनंदसिंग साबळे सहा.पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना वाई शहरामध्ये दोन इसम चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार आहेत . अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर इसमांना ताब्यात घेणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक तयार करुन पुढील कारवाई करणेबाबत सुचना दिल्या . स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने वाई शहरातील बावधन नाका परीसरामध्ये सापळा लावला . मिळाले बातमीतील अनुशंगाने तशाच वर्णनाचे दोन संशयीत इसम मिळुन आल्याने त्यांना पकडुन त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी सुमारे १० महिन्यापुर्वी वाई एस.टी.स्टॅण्डचे मागील बाजुस असले दत्तनगर परीसरामध्ये घरफोडी चोरी केल्याचे कबुली दिली आहे . तसेच सदर घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिने आम्ही वाई शहरामध्ये विक्री करण्याकरीता आणल्याचे सांगितले व त्यांनी आपले कब्जातुन घरफोडी चोरीतील ३२.८ ९ ग्रॅम वजनाचे सोने त्यामध्ये सोन्याचे गंठण , कानातील टॉप व कानातील वेल असे रुपये १,६१.५०० / - किंमतीचे दागिने काढुन दिले . सदरबाबत अधिक माहिती घेतली असता सुमारे १० महिन्यापुर्वी दत्तनगर वाई भागात घरफोडी चोरी झाली असुन त्याबाबत वाई पोलीस ठाणेस गुरनं ३/२०२० भादंविसं कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडुन उघडकीस आणला असुन संशयीतांना वाई पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आलेले आहे . सदर कारवाई श्री अजयकुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा , मा.श्री धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री आनंदसिंग साबळे सहा.पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे सुचनेप्रमाणे सहा.फौजदार श्री ज्योतिराम बर्गे , उत्तम दबडे , पो.हवा.संतोष सपकाळ , पो.ना.रविद्र वाघमारे , प्रविण कांबळे , पो.कॉ.वैभव सावंत . मोहसिन मोमिन चालक पो.ना.संजय जाधव , विजय सावंत , निवृत्ती घाडगे आदींनी सहभाग घेऊन केलेली आहे .