बोर्ली ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी केले अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान
ठरावाच्या बाजूने 696 तर विरोधात570मते 90मते बाद
अमूलकुमार जैन-मुरुड जंजिरा
मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच नौशाद दळवी यांच्यावर उपसरपंच मतीन सौदागर यांच्यासाहित नऊ सदस्यनी अविश्वास ठराव आणला होता. सरपंच नौशाद दळवी हे थेट जनतेतून निवडून असल्याने अविश्वास ठरावासाठी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले होते.त्यानुसार12 नोव्हेंबर2020 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ग्रामस्थांनी सरपंच म्हणून सरपंच नौशाद दळवी याना नाकारत विरोधकांनी त्यांच्यावर टाकलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करीत 126 मते अधिक दिली. सदर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा पदभार हा उपसरपंच नौशाद दळवी यांचेकडे सोपविण्यात आले असल्याचे सभेचे अध्यक्ष नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी जाहीर केले.