वाकुर्डे पूर्णत्वासाठी मानसिंगरांवाचे प्रयत्न कायम-मंत्री जयंत पाटील विश्वास साखर गळीत हंगाम शुभारंभ
उमेश पाटील -सांगली
वाकुर्डे योजनेच्या कामाकरिता आमदार मानसिंगराव नाईक यांनी गेली अनेक वर्षापासून सातत्याने निधीची मागणी कायम ठेवली आहे. आता सरकार व जलसंपदा खाते आपलेच असल्याने वाकुर्डे योजना लवकरच पूर्णत्वास जाईल. या योजनेचे पाणी शेतकऱ्यांना समान देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासोबतच आता चांदोली धरण व चांदोली अभयारण्य समोर ठेवून पर्यटन विकासाकरिताही सरकार प्रयत्नशील आहे. तोही प्रश्न अलीकडील काही कालावधीत तडीस जाईल असे सांगून विश्वास सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांच्या हिताला प्राधान्य क्रम देऊनच प्रशासन यशस्वी राबवले असल्याचे गौरव उद्गार मंत्री जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काढले.
विश्वास साखर कारखाना गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.आमदार मानसिंगराव नाईक, शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाबासाहेब पाटील, सत्यजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील म्हणाले की, विश्वास साखर कारखाना सातत्याने उसाला चांगला दर देत असून कारखाना व उद्योग समूह यांनी अनेक क्षेत्रात सतत आघाडी घेतली आहे. विश्वास उद्योग समूहाने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे मानसिंग भाऊ पुन्हा निवडून आले आहेत आणि मानसिंग भाऊ नाईक यांच्या पुन्हा निवडून येण्यामुळे शिराळा मतदार संघाचा थांबलेला विकास पुन्हा सुरू झाला आहे. विश्वास साखर कारखाना व विश्वास उद्योग समूह हा अग्रेसर ग्रुप असून साखर कारखानदारी केली अनेक राज्यस्तरिय बक्षिसे या कारखान्याने मिळवली आहेत. मानसिंग भाऊ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील महत्त्वकांक्षी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम ही लवकरच पूर्ण होईल. तसेच चांदोली धरणा कडील कामेही लवकरच पूर्ण होतील.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, सध्या साखर कारखानदारी दुहेरी संकटात सापडली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी सक्षम होण्यासाठी साखर कारखान्यावरील संकट दूर होणे गरजेचे आहे. साखरेची किंमत व एफआरपी यांची सांगड घातली गेली पाहिजे. केंद्र सरकारने काही ठाम निर्णय घेणे गरजेचे आहे. साखरेची आधारभूत किंमत ३ हजार पाचशेच्या पुढे ठेवली पाहिजे तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांचे कुटुंब सुद्धा जगले पाहिजे. वाकुर्डे योजना व चांदोली प्रोजेक्टसाठी जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी १०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक युवा नेते विराज नाईक यांनी केले. यावेळी ते म्हणाले, विश्वास कारखाना हा नेहमी नाविन्याची व आधुनिकतेची कास धरणारा आहे. स्वर्गीय फत्तेसिंग नाईक यांचा काळ हा सर्वात महत्त्वाचा व मोलाचा होता. त्यावेळी स्वर्गीय अप्पांनी दूरदृष्टी ठेवून हा कारखाना चालवला
'विश्वास' कारखाण्याचा २०२०-२१ गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते व पन्हाळा - शाहुवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून संपन्न झाला. कारखाण्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, युवा नेते विराज नाईक, विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सभापती वैशालीताई माने, अमरसिंग नाईक, सुरेश चव्हाण, राजेंद्रसिंह नाईक, सम्राटसिंग नाईक,विजयराव नलवडे, युवराज गायकवाड, दिनकर महिंद, प्रमोद नाईक, विवेक नाईक, पृथ्वीसिंग नाईक, अशोकदाजी पाटील, नगराध्यक्ष अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के, रुपाली भोसले, नंदाताई पाटील, राहुल पवार, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते