केंद्र सरकारच्या नव्या कृषी सुधारणा विधेयकासह तीन काळ्या कायद्याविरोधात पंढरीत सह्यांची मोहीम - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, November 6, 2020

केंद्र सरकारच्या नव्या कृषी सुधारणा विधेयकासह तीन काळ्या कायद्याविरोधात पंढरीत सह्यांची मोहीम

 केंद्र सरकारच्या नव्या कृषी सुधारणा विधेयकासह तीन काळ्या कायद्याविरोधात पंढरीत सह्यांची मोहीम 

                   उमेश पाटील -सोलापूर


महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या सुचने नुसार पंढरपूर शहर व तालुका कॉग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी व शेतमजूर कामगार यांच्या बाबतच्या केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी पंढरीत सह्यांची मोहीम राबविण्यात आली.या मोहीमेस शेतकरी,कामगार व शेतमजुरांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून पंढरपूर शहरात विविध ठिकानी राबविलेल्या मोहीस मोठया प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

        ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीस जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोरराजे पवार यांच्यासह कॉगेे्रसचे जेष्ठ नेते बजरंग बागल,प्रतापसिंह रजपूत,नागेश गंगेकर,मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर,पंढरपूर शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले यांनी आपले मनोगर व्यक्त केले.हे विधेयक शेतकर्‍यांच्या अर्थकराणाला मोठा धक्का देणारे असून त्याच बरोबर कामगार कायद्यात करण्यात आलेले बदल हे कामगारांच्या न्यायहक्कावर गदा आणणारे आहेत त्यामुळे प्रत्येकाने त्यास विरोध केला पाहीजे अशी भूमिका मांडण्यात आली.यावेळी सह्यांचे फॉर्म पक्ष निरिक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले.

     यावेळी किशोर पवार,सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

    यावेळी देवानंद इरकल,नागनाथ अधटराव,समीर कोळी,अमर सुर्यवंशी,दत्ता झरकर,बाळासाहेब आसबे,सागर देवकुळे,मधुकर फलटणकर,सुरज कुकडे आदी उपस्थित होते.शेवटी राजू उराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment