तासगाव तालुक्‍यात एकूण 84 अर्ज: काट्याची लढत होणार. - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, December 28, 2020

तासगाव तालुक्‍यात एकूण 84 अर्ज: काट्याची लढत होणार.

 तासगाव तालुक्‍यात एकूण 84 अर्ज: काट्याची लढत होणार.

राजू थोरात -तासगाव 
तासगाव तालुक्यात ग्रामपंचायत मध्ये काट्याची लढाई होणार हे स्पष्ट झाले आहे. काही गावात राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. तर भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

शिवसेनेनेही ताकद पूर्णपणे आपली लावली आहे. तर काँग्रेस पक्ष फक्त मोजक्याच गावात उमेदवार उभा करणार आहे तसेच स्पष्ट दिसत आहे.

तासगाव तालुक्‍यात 39 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे.

दि 28 सोमवार या दिवशी एकूण 84 अर्ज दाखल झालेले आहेत अशी माहिती निवडणूक नियंत्रण  अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांनी माहिती दिली.

हातनोली 12 ,जुळेवाडी 4, कवठेएकंद 8, विसापूर 1, येळावी 1, धोंडेवाडी 2, धुळगाव 3, हातनुर 1, मांजर्डे 5, नरसेवाडी 7, पाडळी 1,दहीवडी 14, गव्हाण 6, जरंडी 5,  पेड 6, सावळज 5, वाघापूर 1, वडगाव 2. असे एकूण 84 अर्ज दाखल झालेले आहेत.

39 ग्रामपंचायती पैकी 23 ग्रामपंचायती ह्या भाजपकडे आहेत तर राष्ट्रवादीकड़े 16 ग्रामपंचायती आहेत.

पोलीस प्रशासनाकडून हायअलर्ट म्हणून कवठेएकंद, विसापूर, सावळज,पेड़, मांजर्डे आणि येळावी ही गावे जारी केली आहेत.

सावळज ग्रामपंचायत आमदार सुमनताई आर पाटील यांचे होमपीच आहे तरीही सावळज मध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे. सावळज मध्ये वार्ड 1 मध्ये शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख मधील तानाजी शिंदे वार्ड 3 मध्ये शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संदीप मारुती मस्के यांनी अर्ज भरला आहे. भाजप व राष्ट्रवादी ला कंटाळून तिसरा पर्याय म्हणून शिवसेनेला जनता पसंद करीत आहे. काँग्रेसच्या गोटात पूर्णता शांतता आहे.

दी 30 पर्यत दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.दी 29 व दी 30 रोजी अर्ज भरन्यास गर्दी होणार आहे गर्दीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या आवारात तासगाव पोलीस साठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

तर प्रत्येक सेतू केंद्रात व नेट कॅफे मध्ये उमेदवार ऑनलाइन अर्ज भरण्यास गर्दी करत आहे.

त्यामुळे तासगाव तालुक्यात भाजप राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षातच काट्याच्या लढती होणार आहेत

No comments:

Post a Comment