माथेरानला दिनांक २७ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या वास्तव्यासाठी हॉर्सलँड हॉटेलला आलेले पर्यटक भूषण शर्मा यांचा iphone 8 + हा फोन दिनांक २८ डिसेंम्बर रोजी
घोड्यावरून फेरफटका मारतांना लुईझा पॉइण्ट येथे साडेबाराच्या सुमारास हरवला होता. तो माथेरान मधील रग्बी विभागात रहाणारे बुवा सनगरे यांना सापडला होता.
हॉर्सलँड हॉटेलचे व्यवस्थापकप्रसाद सावंत यांच्या उपस्थितीत भूषण शर्मा यांना तो आयफोन,सनगरे यांनी त्याचदिवशी संध्याकाळी स्वतः येऊन परत दिला.तेव्हा, पर्यटकांना हर्षानंद होऊन माथेरानच्या लाल मातीतील प्रामाणिकपणा आणि माणुसकी पर्यटकांना खूप भावली आणि पर्यटकांनी हॉर्सलँड हॉटेल व्यवस्थापन आणि सनगरे यांचे मनापासून आभार मानले.