Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

एडस् नियंत्रण व जनजागृती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी-कर्मचारी-संस्थांचा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते गौरव

एडस् नियंत्रण व जनजागृती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी-कर्मचारी-संस्थांचा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते गौरव

जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त राबविण्यात आला उपक्रम

महाराष्ट्र मिरर टीम-अलिबाग


महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई अंतर्गत  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत दि.1 डिसेंबर या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  कर्मचाऱ्यांचा  जिल्हाधिकारी श्रीम. निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते  सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


            रायगड जिल्ह्यातील सन 2019-20 मध्ये त्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टांचे अवलोकन केले असता ग्रामीण रुग्णालय उरण येथील आयसीटीसी समुपदेशक महादेव पवार यांनी 98.57 टक्के, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील आयसीटीसी 02 मधील समुपदेशक श्रीम.कल्पना गाडे  यांनी 97.79 टक्के तर ग्रामीण रुग्णालय मुरुड येथील आयसीटीसी समुपदेशक सचिन जाधव यांनी 97.43  टक्के कामाचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. 

त्यामुळे त्यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय असे क्रमांक देऊन सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून  गौरविण्यात आले आहेत. तसेच उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील  आयसीटीसी समुपदेशक श्री. विकास कोंपले यांनी आपल्या कामाव्यतिरिक्त पीएलएचआयव्ही यांना एआरटी औषधांचे वाटप केले. डापकु विभागातील रविंद्र कदम यांनी ओएनजीसी कंपनी उरण यांच्याकडील सीएसआर फंडामधून मोबाईल आयसीटीसी व्हॅन तसेच कोविड-19 आजाराच्या प्रतिबंधाकरिता अत्यंत आवश्यक असणारे साहित्य ओएनजीसी  कंपनीकडून पाठपुरावा करून मिळवून रायगड जिल्ह्यातील सर्व  आयसीटीसी जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय यांना त्याचा पुरवठा केलेला आहे. तर एनजीओ मधील कुणाल खुटवळ  यांनी त्यांना देण्यात आलेले काम पूर्ण करून LFU  Tracking करिता अपेक्षेपेक्षा जास्त असे उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना या उल्लेखनीय कामाबद्दल  सन्मानपत्र देवून  गौरविण्यात आले. तसेच साथी  या संस्थेमार्फत  जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड,जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील एआरटी केंद्र अलिबाग, धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथील एआरटी केंद्र लोधीवली, ज्योती केअर सेंटर, कळंबोली येथील एआरटी केंद्र, एम.जी.एम. कामोठे येथील एआरटी केंद्र यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 



     यावेळी  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई येथील टी.ई ,एल.एस.एसटीआय  अभय दीक्षित, डॉ.अलका पटनाईक टी.ई. सी.एस.टी. टी. यू., अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, निवासी वैदयकिय अधिकारी (बाह्य) डॉ. गजानन गुंजकर उपस्थित होते. 

  पालकांकडून अर्भकाला एचआयव्ही संसर्ग होऊ नये, याकरिता एचआयव्ही संसर्ग असलेल्या प्रत्येक गरोदर मातेस एआरटी उपचार पद्धती सुरु करून तिच्या बालकाचा 6 आठवडे, 6 महिने, 12 महिने व १८ महिन्यापर्यंत पाठपुरावा घेतला जातो. सुरुवातीच्या पहिल्या 6 आठवड्याकरिता बालकाला नेव्हीरपीन सिरप दिले जाते. एप्रिल ते ऑक्टोबर 20 या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्याकरिता 24 हजार 528 हे उद्दिष्ट असून एचएमआयएस रेजिस्ट्रेशन नुसार 25 हजार 667 इतक्या गरोदर मातांची  तपासणी होणे आवश्यक आहे. त्यापैकी 22 हजार 609 (९२. १८ टक्के) इतक्या गरोदर मातांची एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केलेली आहे. त्यामध्ये 9 गरोदर माता एचआयव्ही संसर्गित असून 10 बालके जिवंत आहेत.ईआयडी अंतर्गत 10  बालकांची डीबीएस (Dry Blood Spot) तपासणी झालेली असून ही 10 बालके एचआयव्ही निगेटिव्ह आहेत. यावरून EMTCT (Ellemation of Mother to  Child Transmission) कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शासकीय यंत्रणेला 100 टक्के यश आलेले आहे. 

सन 2020-21 मध्ये EMTCT कार्यक्रमांतर्गत  95 टक्के व्यक्तींचे एचआयव्ही स्टेटस जाणून घेणे, एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या व्यक्तींपैकी 95 टक्के व्यक्तींना एआरटी उपचार पद्धती चालू करणे, तसेच एआरटी उपचार सुरु करणे, तसेच एआरटी उपचार घेत असलेल्या 95 टक्के व्यक्तींचे व्हायरल लोड संतुलित ठेवणे हा EMTCT कार्यक्रमाचा  मुख्य उद्देश आहे.  


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies