Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अपंगत्वावर मात करून सुरू केला मोबाईल रिपेअर व्यवसाय

अपंगत्वावर मात करून सुरू केला मोबाईल रिपेअर व्यवसाय

चिपळूणच्या राहुल ते सर्वत्र कौतुक

 ओंकार रेळेकर-चिपळूण

जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी मुळे 65 टक्के अपंगत्व आले. *चिपळूणच्या गोवळकोट भोईवडीचा रहिवासी असलेला राहुल मधुकर कासेकर याने बारावी शिक्षणानंतर नोकरी-व्यवसायासाठी अनेक धडपडी केल्या. सुरुवातीला करजाई क्रिएशन्स मध्ये ऑफसेट मशीन ऑपरेटिंग केले.

     त्यानंतर लोटे येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक फार्मसी डिपार्टमेंट मध्ये चार वर्षे नोकरी केली. त्यानंतर छोटेखानी वाळू व्यवसाय सुरू केला. अपंगत्वामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही उदरनिर्वाहाचे साधन शोधण्याची धडपड सुरू होती. चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून अपंगांसाठी असलेली दुचाकी मिळाली आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. 

त्यानंतर बिल्डिंग मेंटेनन्स ची सर्व्हिस सुरू केली. परिसरातील इलेक्ट्रिशन, प्लंबर अशा कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन बिल्डिंग मेंटेनन्स ची कामे मिळू लागली. मात्र लॉकडाउन नंतर सर्वकाही थांबलं. 

मनातली जिद्द काही थांबली नाही. वडिलांच्या सल्ल्यानुसार

लोकडाऊनचा फायदा घेत एका मित्राच्या सहकार्याने मोबाईल रिपेरिंग कोर्स त्याने केला. या क्षेत्रांमध्ये काही महिने अनुभव घेतल्यानंतर 

राहुल याने *चिपळूणच्या काणे बंधू हॉटेल शेजारी एका छोट्याशा जागेमध्ये करजाई मोबाईल नावाने मोबाईल रिपेरिंग चा व्यवसाय आता सुरू केलाय. 

मनातली जिद्द, व्यवसायाबद्दल सचोटी आणि मेहनत करण्याची तयारी हे गुण त्याच्यामध्ये नक्की दिसतात. एका मराठी मुलाने केलेली ही धडपड कौतुकास्पद आहे. 


एकीकडे नोकरी नाही म्हणून बोंब मारून मुंबईकडे पळणारे कोकणी तरुण आणि दुसरीकडे अपंगत्व असलं तरी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द असलेला राहुल हा आजच्या मराठी तरुणांसाठी नक्कीच आदर्श बनलाय. 

कुटुंबाच्या साथीने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने तो इथपर्यंत पोहचलाचं सांगतो. 


तेव्हा आता आपला मोबाइल बिघडला, दुरुस्तीची गरज असली किंवा रिचार्ज करायचं असल तर राहुल कासेकर याच्या करजाई मोबाईल शॉप मध्ये जायला विसरू नका.महाराष्ट्र मिररच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा राहूलला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies