मनसेचा नोकरी मेळावा
विविध क्षेत्रातील ३० ते ३५ नामांकित कंपनी रोजगार देण्यासाठी होणार सहभागी
महाराष्ट्र मिरर टीम -कर्जत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जगभरात ओढवलेल्या कोरोनो सारख्या महाभयंकर परिस्थिती मध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध प्रकारची समाज उपयोगी कार्यक्रम पार पाडले. ज्यामध्ये प्रामुख्याने महिला बचत गटांची वसुलीसाठी होत असलेली पिळवणूक थांबविण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या विराट मोर्चाच्या माध्यमातून सदरची जबरी वसुली थांबवायला भाग पाडले. तसेच वाढीव वीज बिल विरोधात देखील आंदोलन करण्यात आले. येत्या दि. ५ जानेवारी २०२१ रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने तसेच सामाजिक बांधीलकीचे भान जपत जिथे कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये असंख्य लोकांचे रोजगार हातातून गेले असताना. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत - खालापूर विधानसभा यांनी भव्य असा नोकरी - मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळाव्याला विविध क्षेत्रातील ३० ते ३५ नामांकित कंपनी रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहेत. सदर कार्यक्रमास 11 वाजता प्रमुख उपस्थिती अमित ठाकरे नेते शिरीष सावंत, नेते नितीन सरदेसाई, महिला नेत्या स्नेहल ताई जाधव हे उपस्थित राहणार आहेत. तरी कर्जत - खालापूर परिसरातील सुशिक्षित तरुण - तरुणींनी यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले आहे.