म्हसळा श्रीवर्धन रोडवरील सकलप गावानजीक बसला अपघात - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 29, 2020

म्हसळा श्रीवर्धन रोडवरील सकलप गावानजीक बसला अपघात

 म्हसळा श्रीवर्धन रोडवरील सकलप गावानजीक बसला अपघात 

पोलिसांनी दाखवला प्रसंगावधान, पहाटे 5 वाजता जाऊन वाचविले 30 प्रवाश्यांचे प्राण

अरुण जंगम-म्हसळा         म्हसळा श्रीवर्धन रोडवरील सकलप गावच्या वरती म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत हद्दीत मुंबई- दादर हून श्रीवर्धन बाजूकडे जाणारी ट्रॅव्हलर्स ला जबरी अपघात झाला. याविषयी अधिक माहिती देतांना म्हसळा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांनी सांगितले की, बस क्रमांक MH48K1005 ही चालक नदीर अली हाफीजऊल्लाह खान, वय वर्षे 41, राहणार गोडवा कैशोला प्रतापगड उत्तरप्रदेश सध्या राहणार जय हनुमान नगर, दादर, मुंबई. हा बस घेऊन 05:00 वाजण्याच्या सुमारास सकलप रोडवरून श्रीवर्धनकडे जात असताना त्याला झोप आल्याने त्याचा बस वरील ताबा सुटून बस रस्त्याचे बाजूला जाऊन बस कलंडली व अपघात घडला. सदर बस मध्ये एकूण 30 प्रवाशी होते. सदर अपघातात 9 प्रवाशी किरकोळ जखमी असून सदर अपघाताचे घटनास्थळी जाऊन म्हसळा पोलिसांनी तात्काळ बस मधील प्रवाश्यांना उपचाराकरिता म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. सदर अपघातात कोणीही प्रवाशी गंभीर जखमी झालेले नाहीत. अपघातातील बस रस्त्याचे बाजूला असून वाहतूक सुरळीतपणे चालू आहे. बस चालक यांचेवर योग्यती कारवाई सुरू आहे. 
मुद्दा हा उपस्थित होतो की, साईडपट्टीला वायर टाकणाऱ्यानि खोदले नसते तर हा अपघात झाला नसता. सुदैवाने तेथील मोरीवर आणि झाडावर बस अडकली अन्यथा खाली खोल दरीत कोसळली असती आणि मोठी जीवित हानी झाली असती. पर्यटक येत आहेत मात्र रस्ते अरुंद, खराब रस्ते, बेकायदेशीर बांधकामे ही म्हसळा टाकुक्यातील मोठी समस्या आहे. प्रशासनाने इकडे वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे अन्यथा मोठा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment