रिलायन्स आंदोलन सहावा दिवस : मनसेचा आंदोलनाला पाठिंबा
राजेश भिसे-नागोठणे
रिलायन्सच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतापर्यंत या आंदोलनाकडे दुर्लक्षच केले असले तरी, कंपनीत असणारे ठेकेदारीतील कामगार सुद्धा कामावर न जाता या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीत दररोज कामावर जाणाऱ्या कामगारांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. कोणताही आततायीपणा न करता आंदोलनात सहभागी झालेले शेकडो प्रकल्पग्रस्त आणि दुसऱ्या बाजूला उभे असणारे प्रचंड असे पोलीसबळ असेच चित्र दररोज दिसून येत असून रिलायन्सचे अधिकारी सुद्धा पत्रकारांशी अधिकृतपणे बोलत नसल्याने रिलायन्सची बाजू उघडच होत नाही. मात्र, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय येथून उठणारच नसल्याचा ठामपणा प्रकल्पग्रस्तांकडून आज सहाव्या दिवशी सुद्धा खंबीरपणे बोलला जात आहे.