अश्विनी कदम यांची कोरेगाव तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड
प्रतिक मिसाळ- सातारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी युवती प्रमुख मार्गदर्शक खा.सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मान्यतेने अश्विनी रामचंद्र कदम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या Nationalist Youth Congress युवती सेलच्या कोरेगाव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त तालुकाध्यक्षा अश्विनी कदम (शिक्षण- BEIT PGDAC) या देशाचे नेते आणि रा. काँ. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार , खा. सुप्रिया सुळे, रा. काँ. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष . आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ध्येय धोरण समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आजवर एकनिष्ठपणे सक्रीय आहेत, त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक नारायण रामा कदम(आण्णासाहेब) हे क्रांतीसिंह नाना पाटलांच्या सातारा प्रतिसरकार चळवळीमध्ये सक्रीय होते, कदम घराण्याला देशसेवेचा वारसा लाभला आहे, त्या विद्यार्थी व महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतात, आता पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडून, सर्वसामान्य गोरगरीब गरजू निराधार युवती महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील तसेच राष्ट्रवादी युवती महिला संघटना वाढवून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत.असे यावेळी सांगण्यात आले.