Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माथेरान पाणी चोरीचा प्रश्न पेटणार

       माथेरान पाणी चोरीचा प्रश्न पेटणार  

पाणी चोरी प्रकरणी मोठ्या नेत्याचा हात?पालिकेला विश्वासात न घेता बुर्हानी पार्कला दिले गेले पाणी  

         चंद्रकांत सुतार  ---  माथेरान

 


  माथेरानसाठी नेरळ येथून असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून नेरळ येथील बुऱ्हानी पार्क या धनदांडग्या वसाहतीस जुम्मा पट्टी येथील पंपिंग स्टेशन येथून तीन इंची पाईप लाईन द्वारे पाणी दिले गेले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माथेरानमध्ये प्रचंड जनरोष उफाळला असून हे पाणी पळविण्यास मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी माथेरानकर सरसावले आहेत                 तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे माजी आमदार सुरेशभाऊ लाड व माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या प्रयत्नातून माथेरान करिता चाळीस कोटी रुपयांची शून्य अनुदानातून फक्त माथेरान करिता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती त्यामुळे माथेरानमधील पाणीटंचाई प्रश्न कायमचा मिटला होता ही योजना सुरू झाल्यानंतर माथेरान मधील पाण्याचे दरही वाढले होते बहुदा जिल्ह्यातील सर्वात महागडे पाणी हे माथेरान कर विकत घेत आहेत पण काही वर्षांमध्ये ह्याच योजनेतून येथील गावांना पाणी जोडण्या देण्यात आल्या आहेत ह्या आदिवासी वाड्या असल्याने माथेरानकर ही त्यावर आक्षेप घेत नव्हते पण जलप्राधिकारण इतके निर्ढावले आहे की त्यांनी आता वाणिज्य वसाहतीस पाणी विकले आहे माथेरान करांनी अनेकवेळा मंत्रालयाचे उंबरठे झिजवून माथेरान साठी मंजूर केलेली ह्या योजनेवर आता दुसरेच डल्ला मारीत आहेत पैशाच्या जोरावर माथेरानचे पाणी पळविण्यासाठी बुऱ्हानी पार्क मागील दीड वर्षांपासून प्रयत्नशील आहे त्यांचा एक प्रयत्न माथेरान करांच्या एकजुटीमुळे फसला होता त्यावेळी जलप्राधिकारण व माथेरान पालिकेने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले होते ते ताबडतोब रद्द करण्यात आले होते पण बुऱ्हानी पार्क वाल्यानी ह्यावेळी थेट जलप्राधिकारणाच्या वरिष्ठ पातळीवरूनच हे पाणी मिळावे  असे परवाना पत्र आणले असून त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने पळवाट काढताना जुमापट्टी येथील माथेरान लाईनवरून पाणी न देता येथील टाक्यामधून प्रक्रिया न केलेलं पाणी देत असल्याचे सांगितले आहे , हे पाणी अशुध्द असल्याचे कारण जलप्राधिकारणाने दिले आहे त्यामुळे अशुध्द पाणी बुऱ्हानी पार्क सारख्या धनदांडग्या लोकांनी इतक्या इरेला पेटून का घेतले हा मुद्दा समोर येत असून माथेरान पालिकेने येथून पाणी घेण्यास परवानगी नाकारल्या नंतर कुणामार्फत ह्या परवानग्या वरिष्ठ पातळीवरुन मिळविल्या ह्याची चर्चा संपूर्ण दिवसभर माथेरानमध्ये होत आहे येथील स्थानिक प्रशासनाला अंधारात ठेऊन कोणी एका तालुका पातळी वरील वरिष्ठ नेत्याचा ह्या मागे हात असल्याचे चर्चा माथेरानमध्ये आहे.माथेरान साठी असलेल्या ह्या योजनेतून अनेकांना पाणी जोडण्या देण्यात आल्या आहेत माथेरान कर जनता ह्या पाणी योजनेचा वाढीव भार बिल रुपात भरत असताना ह्या अनधिकृत जोडणी धारक मात्र पाणी मोफतच वापरतआहेत व त्यावर जलप्राधिकारणाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळेच बुऱ्हानी पार्क सारख्या खाजगी वसाहती माथेरानचे पाणी चोरण्यासाठी पुढे येत असून असेच राहिले तर माथेरानला पाणी कमी पडणार आहे व ह्या अनधिकृत जोडण्या वाढत जाणार आहेत त्यामुळे पाणी प्रश्नांवर माथेरानची जनता एकवटली असून ही जोडणी त्वरित रद्द करण्यात यावी व ही जोडणी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई व्हावी ह्या करिता गाव पातळीवर सर्व पक्षीय व गावकऱ्यांच्या सभेचे लवकरच आयोजन करणार आहेत.

                     

माथेरान पालिकेने माथेरानला येणाऱ्या पाणीवाहिणीवरून बुऱ्हानी पार्क ला पाणी देऊ नये असे लेखी स्वरूपात पत्र जलप्राधिकारणाला दिले होते पण पालिकेला अंधारात ठेऊन बुऱ्हानी पार्क ने वरिष्ठ पातळीवरून ही परवानगी आणल्याचे समजते ह्यावर चौकशी करून माथेरानचे पाणी पळविण्याचा प्रयन्त करीत असलेल्यांवर दोषी पालिकेकडून निश्चितच कारवाई केली जाईल.

प्रेरणा सावंत नगराध्यक्षा माथेरान

राजकीय नेते जीवनप्राधिकर्णाच्या अधिकारी वर्गाने यामध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार केला असून केवळ माथेरानसाठी कार्यान्वीत असलेली ही पाणी योजना भविष्याची गरज म्हणून तयार केली असून या पाणी चोरीमुळे भविष्यात कमी पाण्याअभावी पर्यटन धोक्यात येणार आहे.

शिवाजी शिंदे -- विरोधी पक्षनेते माथेरान नगरपरिषद


शार्लोट तलावातुन जास्तीत जास्त पाच लाख लीटर प्रतीदिन पाणी पुरवठा होऊ शकतो. त्याची क्षमताच तेवढी आहे. या आकडेवारीवरुन आपल्या लक्षात येईल की माथेरानच जनजीवन, व्यवसाय, उदरनिर्वाह हा पुर्णत: या पाणी योजनेवर अवलंबुन आहे. आपल्यापुरतीच ही योजना तयार केलेली आहे. यामधे कुठेही नेरळ ग्रामपंचायत वा इतर गावांना समाविष्ट केलेले नाही. आपल्या हक्काच्या पाणीपुरवठा योजनेतुन कोणालाही वाटा मिळता कामा नये. आज एका गृहसंकुलाला दिलाय, याच निकषावर दुसरे गृहप्रकल्पही आपल्या पाण्यावर हक्क सांगतील. न्यायालयाकडुन या निकषावर आदेश आणतील. यासाठी प्रत्येक माथेरानकराला लढा द्यावा लागणार आहे. कोणाच्याही दबावाने बुर्‍हानी पार्कला हे कनेक्शन दिलेल असु द्या. कितीही मोठा नेता असु द्यात. सर्वसामान्य माथेरानकरांच्या एकजुटीची ताकत सर्वांना पुरी पडेल. 
आपली ही पाणीपुरवठा योजना स्वत:साठी सुरक्षित ठेवण्याकरता तुम्हाला रस्त्यावर उतराव लागेल. तरच पुन्हा कोणी या पाणी योजनेकडे सोन्याच अंड देणारी कोंबडी म्हणुन वक्रदृष्टी करणार नाही. आपल्या पाण्यावर डाका टाकण्याचा या पुढार्‍यांचा कुटील डाव हाणुन पाडु यात. आणि आपल गाव वाचवु यात. लक्षात ठेवा पाण्याशिवाय माथेरान शुन्य आहे!

         मनोज  वसंत खेडकर--माजी नगराध्यक्ष, माथेरान


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies