तवेरा - ऍक्टिवाची धडक सांगली चा तरुण जागीच ठार
उमेश पाटील -सांगली
तवेरा आणि ऍक्टिवा ची समोरासमोर धडक होऊन ऍक्टिवा चालक ऋषीकेश प्रशांत पराटे ( वय २० ) रा. विश्रामबाग सांगली हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना महांकाली साखर कारखान्याजवळ शुक्रवारी दुपारी घडली .
एम एच १० सी वाय ३४७२ या दुचाकी ऍक्टिवा वरून मयत ऋषीकेश प्रशांत पराटे हा तरुण कवठेमहांकाळ हून सांगली कडे निघाला असता समोरून आलेल्या एम एच १४ बी पी ५४५४ या तवेराची ऍक्टिवा ला धडक होऊन ऋषिकेश पराटे हा जागीच ठार झाला . मयत ऋषिकेश ला कवठेमहांकाळ च्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तिथे डॉक्टरांनी ऋषिकेश मयत झाल्याचे घोषित केले . या अपघात प्रकरणी तवेरा चालक शरद दादासाहेब पवार रा. अलकुड ( एम ) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास हवालदार विजय घोलप हे करीत आहेत .