थर्टी फर्स्टसाठी मिनी ट्रेनच्या फेऱ्यात वाढ,पर्यटकांमध्ये आनंद
चंद्रकांत सुतार-माथेरान
थर्टी फर्स्टचा जल्लोष पर्यटकांना साजरा करण्यासाठी माथेरानमध्ये माथेरानकर हॉटेल्स,घोडेवाले, रिक्षावाले व छोटे मोठे लॉजवाले सज्ज होत असताना मिनी ट्रेनच्या शटल सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून पर्यटकांच्या या आनंदात मध्य रेल्वेने ही सहभागी झाली आहे पूर्वी सहा फेऱ्या होत्या आता त्या सात फेऱ्या होणार आहेत.
दि 28 डिसेंबर पासून माथेरान-अमनलॉज-माथेरान साठी 7 अप आणि 7 डाऊन शटल सेवा करण्यात आल्या आहेत.
दुपारी 12:30 माथेरान ते अमनलॉज
आणि 13:00 अमनलॉज ते माथेरान ही फेरी उद्यापासून वाढवण्यात आली आहे.
एस बी सिंग (TI) रेल्वे प्रशासन
जी एस मीना , स्टेशन मास्तर
माथेरान , शिरीष कांबळे ( CCI)
या सर्वांचे विशेष आभार माथेरानकरांनी मानले आहेत तसेंच सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू होईल त्यावेळी नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू करावी अशी मागणीही नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी मध्य रेल्वेकडे केली आहे.